तुम्ही काळा पेरू ( black guava / kala peru ) कधी बघितला आहे का फक्त एकदाच लागवड करा पुढील 30 वर्ष कमाई करा….

तुम्ही काळा पेरू ( black guava / kala peru) कधी बघितला आहे का फक्त एकदाच लागवड करा पुढील 30 वर्ष कमाई करा.

शेतकरी काळे पेरूची लागवड करून पैसे कमवू शकता आणि मुख्य म्हणजे या पेरूची लागवड एकदा केल्यावर 30 वर्षाहून अधिक चालते. त्यामुळे जमिनीच्या मशागतीचा भरपूर प्रमाणात खर्च वाचतो. तर याबद्दल आपण आणखी माहिती बघूया.

काळा पेरू( black guava / kala peru)
काळा पेरू( black guava / kala peru)

महाराष्ट्र राज्य हे कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे . भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील भरपूर लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. पण आजकालच्या वाढत्या महागाईमुळे शेती खर्च वाढलेला आहे परंतु शेतीमालाला योग्य तो भाव भाऊ मिळत नाही त्यामुळे शेती करणे थोडे अडचणीचे बनले आहे. मी तुम्हाला अशाच एका फळाबद्दल माहिती देणार आहोत तो म्हणजे पेरू . आपल्या सर्वांना पेरू तर माहीत आहे परंतु आपण पाहिलेले पेरू पिवळ्या रंगाचे, हिरव्या रंगाची कच्चे पेरू, बघितलेले आहे. परंतु आज आपण काळ्या रंगाच्या पेरूची माहिती घेणार आहोत . सरकार हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती क्षेत्रात फार नवीन नवीन बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. आणि शेतकरी ही त्यासाठी पूर्णपणे मेहनत घेत आहे दरम्यान महागाई च्या काळात शेतकऱ्यांना शेती ही त्यात शेतकरी आत्तापर्यंत नगदी पिके दुर्मिळ ठिबक विना घेत होत म्हणजे पारंपारिक पद्धतीने शेती करत होते आणि ही शेती आता खर्चिक झाल्यामुळे त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाने व नवनवीन प्रयोग करून शेती करणे गरजेचे आहे तरच भविष्यात शेती परवडू शकेल . आणि त्यातच हे आलेले नवीन काळा पेरू हे महागडे पीक आहे यातून शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे आणि ही पीक हे कमी खर्चात आपण कल्टिवेशन करू शकतो त्यामुळे हे पीक नक्कीच भविष्यात शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.

काळे पेरूची लागवड –

मीडियाच्या रिपोर्टनुसार काळ्या रंगाच्या पेरूची जात बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे आणि अलीकडेच या पेरूची लागवड हिमाचल प्रदेशातील सिरमोहोर जिल्ह्यातील कोलार भागात अलीकडे चालू झालेली आहे. उत्तर प्रदेशामध्ये या पेरूच्या जातीचे पेरूचे रोपे उपलब्ध आहेत आणि सध्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भरपूर ठिकाणी या पेरूची लागवड केली जात आहे. आणि अक्षरशः पेरूच्या पानांचाही रंग काळा आहे. आणि हेच त्यामुळे हे सामान्य पेरू पेक्षा खूप आकर्षक वाटतात आणि यातील पेरूच्या आतील रंग गडद लाल किंवा राखाडी असतो. जसे आपण बघतो आहोत आपले भारतामध्ये हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पेरूला प्रचंड मागणी असते तसेच त्याचप्रमाणे याही पेरूला भरपूर प्रमाणात मागणी असेल आणि पेरू हे फळ शरीरासाठी उपयुक्त असते आणि तसेच हे फळ नवीन असल्यामुळे , आकर्षक असल्या दिसायला आकर्षक असल्यामुळे याला मागणी ही चांगल्या प्रमाणात असणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही पण या प्रकारची शेती करून कमाई करू शकता. आता होईल काळे पेरूची व्यवसायिक शेती केल्याने फायदा-
आतापर्यंत भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये बाजारपेठेत मार्केटमध्ये फक्त पिवळा पिवळा आणि हिरवा पेरू आपण बघत होतो आणि याचाच बोलबाला होता पण आता नवीन काळे पेरूची शेती करून मी काळे पेरू साठी नवीन मार्केट तयार शक्ती आणि याची लागवडीसाठी थंड तापमान आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली ही सर्वात योग्य आहे आणि तसेच कृषी तज्ञांच्या मते लागवडीपूर्वी कृषी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून आपली पीक हे चांगले येईल.

काळा पेरू खाण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत-

 1. रोगप्रतिकार शक्ती सुधारते-
  काळे पेरूमध्ये विटामिन सी चांगल्या प्रमाणात आहे म्हणून काळे पेरूचे आपण सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीर बॅक्टेरिया व विषाणूक्रमित होण्यापासून बचाव होतो.
 2. अशक्तपणा दूर होतो-
  जर माणसाला अशक्तपणा असेल तर काळे पेरूचे सेवन केल्याने तो दूर होतो कारण अशक्तपणा हा शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो आणि अशातच या काळे पेरू मध्ये लोहाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात आढळते त्यामुळे या पेरूचे सेवन केल्याने ॲनिमिया याच्या समस्येपासून सुटका होते .
 3. त्वचेसाठी फायदेशीर आहे-
  काळे पेरूचे सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरते कारण काळे पेरूमध्ये विटामिन सी बरोबरच अँटी एक्सीडेंट गुणधर्म आहेत त्यामुळे याचे सेवन केल्याने त्वचेत सुधारणा होते.
 4. बुद्धकोष्ठतेची समस्या दूर होते-
  बुद्धकोष्ठते काळे पेरूचे सेवन केल्याने फारच छान परिणाम दिसून येतात काळे पेरू मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ते आपल्याला बुद्धकोष्ठता दूर करण्यास परिणाम कारक आहेत.
 5. मुळव्याधासाठी उपचार-
  मुळव्याध ही अत्यंत त्रासदायक आजार आहे काळे पेरूचे सेवन केल्याने ते यावर फार फायदेशीर ठरते त्यामुळे मुळव्याधा पासून आराम मिळण्यास उपयोग होतो.
 6. डोळ्यांसाठी फायदेशीर आहे-
  काळ पेरू खाल्ल्याने डोळ्यांवरही चांगले परिणाम दिसून येतात यामध्ये विटामिन ए असल्याने जे दृष्टी सुधारण्यास आपणास मदत करते.त्यामुळे हे दृष्टी डोळ्यांसाठी फारच उपयुक्त आहे.

आणखी वाचा

Satbara Utara Online : आता करा सातबारा उताऱ्यावर वारस नोंद ऑनलाईन ..

Artificial Rain In Maharashtra महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस शक्यता पाडण्याची शक्यता ..

3 thoughts on “तुम्ही काळा पेरू ( black guava / kala peru ) कधी बघितला आहे का फक्त एकदाच लागवड करा पुढील 30 वर्ष कमाई करा….”

Leave a Comment