Govardhan govansh seva kendra गाई पाळण्यासाठी “गोवर्धन गोवंश गोवन सेवा केंद्र” योजना आता 15 ते 25 लाख रुपये अनुदान सरकारने सुरू केली नवीन योजना…..

Govardhan govansh seva kendra

“गोवर्धन गोवंश गोवन सेवा केंद्र” योजना

govardhan save kendra scheme
govardhan save kendra scheme

गाई पाळण्यासाठी  गो-शाळा  निर्माण व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गो-शाळांना सरकारने अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. “गोवर्धन गोवंश गोवन सेवा केंद्र” (Goverdhan govansh seva kendra)असे या योजनेचे नाव आहे.”गोवर्धन गोवंश गोवन सेवा केंद्र” योजनेमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक एका वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये एक स्वतंत्र गोशाळा असेल आणि ते उभारण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त 25 लाख आणि कमीत कमी 15 लाख असे अनुदान जाहीर केले आहे.

गोवर्धन गोवंश गोवन सेवा केंद्र” योजनेमध्ये 50 ते 100 गाईचे पालन करू इच्छिणाऱ्यांना गोशाळांना प्रत्येकी 15 लाख रुपये ते 100 ते 200 गाईपर्यंत पालन करणाऱ्या गोशाळांना वीस लाख रुपये तर 200 हून अधिक चे गाईंचे सांभाळ करणाऱ्यांना संभाळ करणाऱ्या गोशाळांना प्रत्येकी 25 लाख रुपये इतके जास्तीत जास्त अनुदान दिले जाणार आहे. ही योजना पूर्वी चालू होती परंतु आता या योजनेमध्ये काही बदल करून योजना पूर्ण पुन्हा नवीन पद्धतीने लागू होणार आहे..

17 जून2023 रोजीच्या शासन राज्यातील 324 तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून सेवा केंद्र योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि योजने करता अर्ज सुरू झालेले आहेत त्याच्यासाठी 17 जून 2023 पासून 17 जुलै 2023 पर्यंत राज्यातील जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला 17 जुलै 2023 पूर्वी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये हा अर्ज प्रस्ताव सादर करायचे आहेत. मित्रांनो याच्यासाठी सादर करावयाच्या अर्जाचा प्रस्तावाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये गाई किती गाईचे वासरा किती  म्हशी, रेडे इत्यादी बद्दलची माहिती याचप्रमाणे संस्थेने पशुधन संख्येवर किती मागणी केलेली आहे.

आणि त्यानुसार किती अनुदानाची रक्कम दिली जाऊ शकते 200 पेक्षा जास्त पशुधन असेल तर 25 लाखापर्यंत अनुदान या ठिकाणी दिल्या जातात संस्था व संगोपनाचे काम केव्हापासून करते याच्यानंतर त्यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे का असेल तर त्याचा सातबारा जोडावा लागणार आहे, याचप्रमाणे जर भाडेपट्टी करारावर जमीन असेल तर त्याच्याबद्दलची माहिती त्याचा भाषणाच्या साधना काय आहे तर याच्यामध्ये विहीर , बोरवेल , शेततळ आहे का आणि नसेल तर याच्या अंतर्गत दिले जाते किंवा बोरवेल देखील खोदून दिला जातो संस्थेकडे झाड लागवड करण्यासाठी ठिकाण उपलब्ध आहे का चाऱ्याची सोय व्यवस्थादेखील केली जाते याप्रमाणे मुरघासाचा प्रकल्प आहे का,  कडबा कुट्टी यंत्र आहे का नसेल तर ते यंत्र देखील दिला जातो. गांडूळ खत प्रकल्प आहे का बायोगॅस प्रकल्प आहे का इत्यादी सर्व माहिती याच्यामध्ये भरायचे आणि संस्थेच्या अध्यक्षाचे सचिवाचे स्वाक्षरी करून हा अर्ज याठिकाणी भरायचे याच्यानंतर ,एक संस्थेला शपथपत्र सादर करायचे त्याच्यामध्ये सर्व माहिती बरोबर आहे अशी शपथ पत्र सादर करायचे आहे.

उद्देश
पशु पैदाशीस, दुग्धोत्पादनास, शेतीकामास, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या बैल, गाय, वळू, या गोवंशाचा सांभाळ करणे.
शेण, गोमूत्र, यापासून विविध उत्पादने, गोबरगॅस, खत, व इतर उपपदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे.
केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे.
पशुधनासाठी चारा, निवाऱ्याची, पाणी, सोय उपलब्ध करून देणे.

लाभार्थी अटी व शर्ती

ही योजना लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष, अटी व शर्तीही विभागाने निश्चित केल्या आहेत.
संस्था धर्मादाय आयुक्तांकडे- नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
संस्थेस गोवंश संगोपनाचा 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
संस्थेने मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 भांडवल संस्थेकडे असणे गरजेचे आहे.
केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण, चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे 30 वर्षाच्या भाडेपट्ट्यावरची/ स्वतच्या मालकीची किमान 15 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
संस्थेस गोसेवा कार्य करण्यासाठी शासनासोबत करारकरणे बंधनकारक करण्यात आले आहेत.
संस्थेचे मागील 3 वर्षांचे previous 3 year Audit  लेखापरीक्षण झालेले असणे,  संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे ,त्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

अर्ज असा करा

” गोवर्धन गोवंश सेवा केंद्र  2023″ नुसार विहित नमुन्यात अर्ज दिलेल्या कागदपत्रांसोबत अर्ज सादर करायचा आहे. या अर्जाची PDF फाईल जोडण्यात आलीय. यामध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची अधिक सूचना तसेच माहिती देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सादर करावेत.

हे पण वाचा

Electric Water Motor Pump Yojna 2023 इलेक्ट्रिक मोटार पंप योजना 2023 …

PVC pipe subsidy yojana 2023 Maharashtra पाईपलाईन अनुदान योजना बद्दल जाणून घ्या ..

Leave a Comment