मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2023 Mukhyamantri Saur Krushi yojna 2.0….

Mukhyamantri Saur Krushi yojna

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांना सोलर प्रकल्पासाठी भाड्याने देऊन प्रत्येक वर्षी 50 हजार रुपये पर्यंत भाडे मिळणार आहे .मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जमिनी सोलर प्रकल्पासाठी भाड्याने देण्याकरता 50K रुपये प्रति एकर प्रति वर्ष अर्थात सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर एवढं भाडं दिल जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी तीन टक्क्याने वाढ केले जाणार आहे.

mukhyamantri saur krushi vahini Yojna 2.0
mukhyamantri saur krushi vahini Yojna 2.0

आलेली त्यासाठी राज्य शासनाने आपल्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे त्याची लिंक खाली प्रमाणे आहे.
https://www.mahadiscom.in/solar-mskvy/index.php

प्रथमता या पोर्टलवर आपल्याला व्हिजिट करून आपली नोंदणी आपल्या जमिनीची नोंदणी करायची आहे त्यासाठी आपल्याला जमिनीचा पुरावा म्हणजे आठ सात बारा आणि एकत्र जमीन असेल किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींची नावे जमीन असेल आणि आपल्याला एकत्रित ही जमीन या प्रकल्पासाठी द्यायची असेल तर आपणाला सहमती पत्र जोडावे लागते.आणि त्यावर सर्व जमीन धारकांच्या स्वाक्षरी लागतात. तसेच फेरफार सुद्धा अपलोड करावा लागतो.

ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर एम एस सी बी अधिकारी पोर्टलवर भरलेली माहिती चेक करून रजिस्ट्रेशन स्टेटस अपडेट करतील आणि काही त्रुटी असल्यास संपर्क साधतील त्यानंतर काही दिवसांनी आपल्या जमिनीचा सर्वे करण्यात येईल आणि सोलर पावर प्लांट डेव्हलपर आणि एमएसईबी अधिकारी यांच्या यांच्या निर्णयानंतर तुमची जमीन भाडेतत्त्वावर घेण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

आणि यामध्ये असलेली वाढ पंधराशे / 1500 रुपये प्रत्येक एकर दरवर्षी वाढ असेल.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 –

2025 पर्यंत 30% टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा.

शेती पंपांना दिवसा अखंडित आणि शाश्वत वीज पुरवठा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महावितरण मार्फत योजना राबविण्यात येणार आहे. 2025 पर्यंत 30% कृषिवाहिन्या सौरऊर्जेवर आणण्याचे लक्ष्य आहे.

राज्यातील ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना होईल असे शासना कडून सांगण्यात आले आहे याचा लाभ .

2023-24 या कालावधीसाठी एकूण 700 कोटी रुपयांच्या निधीस आणि त्यापैकी 2023-24 साठी 25 कोटी रुपये इतक्या निधीस हरित-ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांवर  जागा उपलब्धतेची जबाबदारी असणार आहे.

खाजगी अथवा शेतकऱ्यांच्या  जमिनीला 1,25,000 रुपये प्रति हेक्टर अथवा रेडीरेकनर दराच्या 6%  यापेक्षा जे अधिक असेल ते , इतके वार्षिक भाडे आणि सोबतच 3% दरवर्षी भाडेदरात वाढ मिळणार आहे.

हरित ऊर्जा निधीतून एकूण 1900कोटी  5 वर्षामध्ये गुंतवणूक करणार आहेत.

 योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो-

 1. शेतकरी स्वतः
 2. साखर कारखाने
 3. जल उपसा केंद्र
 4. संस्था
 5. को-ऑपरेटिव्ह सोसायटी
 6. ग्रामपंचायत
 7. शेतकऱ्यांचा गट
 8. वॉटर युजर असोसिएशन

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 

 योजना नियम & अटी:-

जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी 3 एकर व जास्तीत जास्त 50 acre असावे.

जमीन मालकांची संख्या एकापेक्षा जास्त असल्यास त्यांच्यापैकी एका व्यक्तीला Authority/नामनिर्देशित करून त्या नावाने अधिकार पत्र / Authorization letter देणे बंधनकारक आहे.

सदर जमिनीची   हद्द निश्चित करणे व ठरविणे ही जबाबदारी अर्जदाराची असते.

अर्जदाराने 2 महिन्याच्या आतील 7/12, 8-अ , फेरफार  मूळ-प्रति अपलोड कराव्यात.

जमीन तारण मुक्त, अतिक्रमण मुक्त ,  व इतर कोणत्याही संस्थेचा बोजा, मुक्तकर्ज मुक्त करून देण्याची जबाबदारी अर्जदाराची असते.

अर्जामध्ये काही त्रुटी-असल्यास अर्जदाराने पुन्हा पोर्टलवर  माहिती भरावी.

सदर जमीन महावितरणच्या 33/11 KV Substation पासून 5 Km आत मध्ये असावी.

अर्जदाराने पुढील प्रक्रियेसाठी 1000 रु. + 18 टक्के GST भरावी.

अर्जदारा कडून एका गटातील एका जागेसाठी अर्ज स्वीकारला जाईल.

महावितरण कंपनी ला भाडे-तत्त्वावर प्रत्यक्षात हस्तांतरित केलेल्या जागेचा करारनामा केला जाईल.

भाडेतत्त्वावर देण्यात येणारी जमीन ही क्लियर-टायटल करून देण्याची जबाबदारी अर्जदाराची असते.

अर्जदाराने जागेच्या सर्वेक्षणासाठी जागेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज असा करा –

या योजनेसाठी  तुम्ही खालील पद्धतीने अर्ज हा या योजनेसाठी करू शकता ,कृषी अधिकाऱ्याची भेट घेऊन व कृषी कार्यालयांमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

 • अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला सौर कृषी वाहिनी योजनेच्या mahadiscom.in/solar अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे.
 •  तिथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दिसेल त्या योजनेवर क्लिक करून तुम्हाला नोंदणी पर्यायावर ती क्लिक करा.
 • तुमच्या समोर एक नवीन पेज , ज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना  New user Register  असा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करा.
 • एक नवीन पेज उघडून  तुम्हाला तिथे एक नोंदणी अर्ज दिसेल ज्यामध्ये ,संपूर्ण आवश्यक माहिती भरा.
 • सर्व माहिती भरल्यानंतर तिथे दिलेली सर्व कागदपत्रे PFD/ स्वरूपात व फोटो jpeg तिथे अपलोड करा.
 • नंतर तुम्हाला खाली सबमिट असा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करून तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करा.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी घरबसल्या अर्ज करू शकता व  तुमच्या जवळच्या MSEB  कार्यालयां-मध्ये जाऊन  माहिती घेऊ शकता

हे पण वाचा :

Electric Water Motor Pump Yojna 2023 इलेक्ट्रिक मोटार पंप योजना 2023 …

PVC pipe subsidy yojana 2023 Maharashtra पाईपलाईन अनुदान योजना बद्दल जाणून घ्या ..

Leave a Comment