Satbara Utara Online : आता करा सातबारा उताऱ्यावर वारस नोंद ऑनलाईन ..

Satbara Utara Online वारस नोंद ऑनलाईन करता येणे शक्य.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा मोठ्या सदस्यांच्या मृत्यू नंतर शेतीची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी सरकारी उपक्रम मध्यंतरी संपले पाहिजेत या सर्व चरणांमध्ये वारसाच्या नोंदी बराच वेळ लागत होता लागतो सरकार ने आता याबद्दल काही नवीन निर्णय घेतले आहे. ते खालील प्रमाणे आहे आणि त्यामुळे या प्रोसेस मध्ये भरपूर बदल घडून येतील आणि प्रोसेस ही अति जलद गतीने होईल आणि योग्य वेळेत होईल.

satbara vars nond online
satbara vars nond online

आता सातबारा पास मिळवण्यासाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून आपल्याला अर्ज करावा लागतो आणि कागदपत्र अपलोड करावे लागतात त्यानंतर तलाठी व मंडळ नोंदणीसाठी लॉगिन करतात आणि शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये तलाठी व मंडळ पडताळणी करून वारस नोंद पास केली जाते आणि हे काम आपण घरबसल्या ऑनलाईन करू शकतो .त्यामुळे आता वारस नोंदीसाठी तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज राहिली नाही. यापूर्वी वारसाची नोंद करण्यासाठी तलाठी सर्कल येथील तलाठी कार्यालयात जावे लागत होते आणि तेथे जाऊन आपल्याला अर्ज करावा लागतात लागत होता . तिथे आपणाला तलाठी उपलब्ध असतील याची खात्री नसायची आणि फार वेळ खर्च होईल होत होता त्यामुळे आता आपल्या खर्चालाही आळा बसलेला आहे आणि वेळेचाही बचत होईल. तर आपण खालील लिंक वर ऑनलाइन अर्ज करू शकतो.

वारस नोंद ऑनलाईन कशी करायची  ?

  • https://pdeigr.maharashtra.gov.in/ या लिंक वर क्लिक करावे.
  • या लिंक वर क्लिक करून पेज ओपन झाल्यानंतर प्रोसेस टू लॉगिन करून आपले खाते उघडावे आणि नंतर योग्य ती माहिती भरून अर्ज करावा आणि योग्य ते कागदपत्र अपलोड करावे.

 

वारस नोंद कशी कराल?

वारस नोंद करण्यासाठी शासनाच्या https://pdeigr.maharashtra.gov.in/  या लिंक वर क्लिक करावे. महा भूमी संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे त्यानंतर वारस नोंदी साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल आणि त्याचे पेमेंट करावे लागणार आहे. आणि त्यानंतर हा दाखल केलेला अर्ज तलाट्यांकडे जाईल तलाठी त्या अर्जाची योग्य प्रकारे हाताळणी पडताळणी करेल. आणि अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर केली जाईल जर अर्जामध्ये काही त्रुटी व अपूर्ण कागदपत्रे असल्यास त्याची कल्पना तुम्हाला एसएमएस किंवा मेल द्वारे दे कळवण्यात येईल.

वारस नोंदी साठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे-

मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत ही मृत्यूचा दाखला आपण ग्रामपंचायत कार्यालयातून प्राप्त करावा.
कुटुंबातील रेशन कार्डची झेरॉक्स कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती .
मृत व्यक्तीच्या नावावर असलेले सातबारा व 8 अ कागदपत्रे .
तसेच या व्यतिरिक्त एक शपथपत्र की ज्यात वृत्त व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे व त्यांचा संपूर्ण पत्ता देणे गरजेचे आहे .

वारस नोंदणी करणे का महत्त्वाचे आहे-

 शासनाचे काही कायदे आहे त्यातच जमीन महसूल अधिनियम 1966 च्या 149 कलमानुसार जर एखादी व्यक्तिमत झाली त्यानंतर आपला जमिनीवर व त्याच्या प्रॉपर्टी व हक्क तयार झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत आपण वारस हक्क केल्याचे वृत्त तलाठ्याला कळवण्याची जबाबदारी ही वारसाची असती.
जर आपण ही माहिती तलाठ्याला लेखी स्वरूपात कळवली नाही तर आपला जमिनीवरचा हक्क जात नाही परंतु आपणास दंड भरावा लागतो. आणि वारस नोंद करण्यासाठी आपण मृत व्यक्तीचे वारस आहोत हे आपल्याला सिद्ध करावे लागते म्हणजेच पहिल्या पूर्वजांचा मृत्यू झाला आहे त्यासाठी आपल्याला मृत्यूचा दाखला जो की ग्रामपंचायत आपल्याला उपलब्ध होतो तो या अर्जासाठी जोडावा लागतो.

वारस नोंद म्हणजे काय असते?

जर एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी किंवा शेत जमीन ही त्याच्या नावे असेल व त्याच्या मृत्यूनंतर ती कोणाच्या नावे करण्याचे आहे , त्याची नोंद त्या व्यक्तीची नोंद करणे म्हणजे वारस ना म्हणजे आपल्या पश्चात ती प्रॉपर्टी किंवा शेतजमीन त्या वारसाच्या नावे होते.
सर्व प्रॉपर्टी चे हक्क वारसाला हस्तांतरित केले जातात.

वारस नोंद किती दिवसात करावी लागते?

वारस नोंदी व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत करावी लागते. त्यानंतर पडताळणी होते व 15 ते 18 दिवसानंतर फेरफार मध्ये कायदेशीर बदल करण्याचा आदेश दिला जातो.

कायदेशीर वारस कोणाला मानले जाते?

जर एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर कायदेशीर मालक त्याची पत्नी किंवा पती मुले किंवा पालक यांना मानले जाते.

तुम्ही हा लेख वाचल्याबद्दल तुमचे आभार आणि हाच लेख तुमच्या मित्रांशी,नातेवाईकांशी शेअर करावा.

 

वाचा –

Artificial Rain In Maharashtra महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस शक्यता पाडण्याची शक्यता ..

या 11 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पिक विमा / agrim pik vima