Vihir Anudan Yojna Maharashtra | विहीर अनुदान योजना आता विहिरींसाठी 4 लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना

Vihir Anudan Yojna विहीर अनुदान योजना आता विहिरींसाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.महाराष्ट्रात शासनाद्वारे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी भरपूर योजना राबवले जातात त्यातच ही म्हणजेच विहीर योजना शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त अशी योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शासन चांगले योजना आणत असते. आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण अशा योजनेची माहिती बघणार आहोत या योजनेचे नाव आहे आहे योजनेला मागेल त्याला विहीर magel tyala vihir या नावाने देखील ओळखतात.

Vihir Anudan Yojna Maharashtra
Vihir Anudan Yojna

राज्यात भरपूर शेतकरी आपल्या शेतातून कष्ट करून पैसे कमवत असतात परंतु आजकालच्या वाढत्या महागाईमुळे विहीर खोदणे आर्थिक दृष्ट्या फार अवघड झाली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील भरपूर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे या योजने तून शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान शासनात मार्फत देण्यात येते. ज्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध होईल. जसे की आपणाला माहित आहे की मनरेगा ही योजना संपूर्ण भारतात राबवली जाते आणि मागील काही काळापासून महाराष्ट्रात मनरेगाच्या अंतर्गत भरपूर काही कामे होत आहेत आणि शेतकऱ्यांना रोजगार पण दिला जात आहे. याच मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला लखपती बनवण्यासाठी बनवण्याचा निर्धार शासनाने केला आहे आणि भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 एवढ्या विहिरी खोदण्यास शक्य आहे.

 

योजनेचे नाव- विहीर अनुदान योजना | Vihir anudan yojna
राज्य – महाराष्ट्र
विभाग – कृषी विभाग
लाभ- 4 लाख रुपये
उद्देश्य- शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देणे
लाभार्थी- राज्यातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन/ऑफलाईन

 

विहीर अनुदान योजना योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो –

Magel Tyala vihir   benificiary –

 • या योजनेतील व्यक्ती महाराष्ट्रात असावी महाराष्ट्राचे रहिवासी असावी व त्याच्याकडे जॉब कार्ड अनिवार्य आहे.
 • या योजनेत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी.
 • अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी .
 • भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील शेतकरी इतर मागासवर्गीय शेतकरी .
 • महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला.
 • सीमांत शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे अडीच एकर पर्यंतच जमीन आहे.
 • निराजी सुचित जमाती .
 • दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती.
 • जमीन सुधारक योजनेचे लाभार्थी.
 • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
 • अनुसूचित जमाती व अन्य परांगत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 चे लाभार्थी .
 • अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच ज्यांच्या पाच एकर च्या आतील शेतकरी.
 • शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती करता असलेले कुटुंबे.

 

जुन्या योजनेतील विहीर अनुदान योजनेतील बदल

Vihir anudan Yojna

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तर याआधीही योजना कार्यरत होती परंतु या नवीन योजनेमध्ये विहिरीमधील अंतराची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. आणि यापूर्वी या योजनेचे अनुदान ही तीन लाख रुपये होते आता ते बदलून चार लाख इतके करण्यात आलेले आहे. पूर्वी प्रत्येक गावात किती विहिरी असणार यावर मर्यादा होतील आता ही मर्यादा पण हटवण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळावा शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या फायदा व्हावा आणि रोजगार उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे हाच या योजनेचा उद्देश आहे.

Vihir Anudan Yojana Beneficiary Eligibility –

विहीर अनुदान योजना लाभार्थी पात्रता-

 • अर्जदाराकडे किमान एक एकर 0.40 हेक्टर क्षेत्र असावे.
 • महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 च्या कलम तीन नुसार अस्तित्वात असलेले पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर परिसरात सिंचन विहीर स्रोताच्या नाही .
 • दोन सिंचन विहिरी मधील अंतर 150 मीटर पुढील बाबींसाठी लागू राहणार नाही-  1. अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र्यरेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
  2. मनरेगा रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराचे अट लागू राहणार नाही.
 • लाभधारक लाभार्थ्याच्या सातबारावर याआधी विहिरीची नोंद असू नये.
 • लाभार्थ्याकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी असलेला.
 • एका पेक्षा जास्त लाभार्थी एकत्रित विहीर घेऊ शकतात परंतु त्यांच्या जमिनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावी.
 •  लाभार्थी जॉब कार्ड धारक पाहिजे.

योजनेची निवड पद्धती-

 • अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर जमा झालेल्या अर्जांपैकी तालुकास्तरीय समिती दर पंधरा दिवसांनी प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करेल व पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करेल यानंतर पत्र लाभार्थ्यांची यादीही जिल्हास्तरीय समितीकडे पाठवली जाईल.
 • जिल्हास्तरीय समिती क्रमानुसार या लाभार्थ्यांची निवड करेल.
 • विहिरीच्या एकूण लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असेल तरउरलेले लाभार्थी waiting list मध्ये असेल.

हे वाचा

UPI ATM Machine : एटीएम मधून पैसे काढणे झाले सोपे आता निघणार ATM card शिवाय पैसे …

Ayushman bharat digital mission / Ayushman bharat yojana आयुष्यमान भारत कार्ड या योजनेतून मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार …